पंढरपूर नगरपरिषदेवर IAS अधिकार्‍याची नेमणुक व्हावी !

अमरजीत पाटील.
पंढरपूर- भारताची दक्षिण काशी तिर्थक्षेत्र पंढरपूर येथे वर्षातून भरणार्‍या चार प्रमुख वार्‍या पाहता व पंढरपूर नगरपरिषदेला वर्षाला विकासकामांना मिळणारा निधी पाहता,मिळालेल्या निधीतून होणारी कामे दर्जेदार होण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पद रद्द करुन खासबाब म्हणून आयुक्तपद निर्माण करण्यात यावे.व सदर आयुक्तपदावर IAS अधिकार्‍यांची नेमणुक करण्यात यावी.

आजवर पंढरपूर नगरपरिषदेमध्ये probation period वरती आलेल्या IAS अधिकार्‍यांनी कायद्याने प्रभावी कामकाज केलेले आहे.बाकी,अपवादात्मक नावे वगळता आजवर मुख्याधिकारी म्हणून आलेले अधिकारी हे सत्ताधार्‍यांचे गुलाम म्हणून काम करत आलेले आहेत.त्यामुळे पंढरपूरला तिर्थक्षेत्र म्हणून मिळणारा निधी आणि सदर निधीच्या माध्यमातून कामे होत असताना त्या कामांचा दर्जा हा कायम संशोधनाचा विषय राहिलेला आहे.कोट्यावधी रुपयांचा निधी खर्चूनसुद्धा दखल घेण्याजोगा बदल पंढरपूरमधील विकासकामांमधून दिसून येत नाही.या सगळ्या प्रकाराला पायबंद्ध घालायचा असेल तर पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पद रद्द करुन खास बाब म्हणून आयुक्त पद निर्माण करणे व सदर पदावर भारतीय प्रशासन सेवेतील (IAS) अधिकार्‍यांची नेमणुक करणे हाच एकमेव मार्ग आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.