अनाथांच्या ‘माई’ काळाच्या पडद्याआड… ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांंचे निधन…

अनाथांची माता म्हणून विख्यात असणार्‍या ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांचे आज उपचार सुरू असतांना निधन झाले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ७३ वर्षांच्या होत्या, रात्री ८ वाजून १० मिनिटांनी त्यांनी जगाचा निरोप घेतला. पुण्यातील गॅलॅक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतांना त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. महिना भरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. काल ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
सिंधूताई सपकाळ यांनी आजवर हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे. त्यांना २०१२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता तर २०२१ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोक संवेदना व्यक्त करण्यात येत आहे.
पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांनी समाजातील निराधार बालकांचे संगोपन करण्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पीत केले आहे. आजपर्यंत सुमारे १००० मुले सज्ञान होऊन बाहेर पडले आहे. पुण्याजवळील मांजरी बुद्रुक शिवारात माईंचे मनशांती छात्रालय असून येथे ५० मुले आश्रयास आहे. सासवड येथील केंद्रात ७५ मुली व शिरुर येथील केंद्रात ५० मुले, चिखलदार येथे ७५ मुली, वर्धा येथे २५० भाकड गायी आहेत.
आपल्या संपूर्ण आयुष्यात अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथांचा सांभाळ करणाऱ्या माई प्रत्येकाला आपल्याशा वाटत. त्यांना भेटणाऱ्या प्रत्येकाची त्या आपुलकीनं विचारपूस करत. त्यांच्या या स्वभावागुणानं हजारो नाती त्यांनी कायम जोडून ठेवली. २०१२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, २०२१मध्ये पद्मश्री हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुळच्याच बुद्धिमान असलेल्या माईंचं जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिक्षण झालं होते. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह पार पडला होता. आयुष्यात वेळोवेळी येणारा संघर्ष त्यांना समाजसेवेकडे नेत गेला. अनाथांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती.
१९९४मध्ये पुण्यातील पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरू झाली. कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे आणले. इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. मुलांच्या शिक्षणासह खाण्यापिण्यासह कपड्यांची व्यवस्थाही केली. त्यांना लागणाऱ्या इतर जीवनावश्यक वस्तूही पुरविल्या.
या मुलांनी शिक्षण पूर्ण करावं, स्वतःच्या पायावर उभं रहावं, इथल्या मुलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावं, हे स्वप्न माई पाहत होत्या. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांचं लग्नकार्यही विधीवत पार पाडणे हे कामही संस्था करते.

Leave a Reply

Your email address will not be published.