‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांची १९० वी जयंती साजरी

स्वेरीचे कार्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याप्रमाणेच -समाजसेवक दिलीप गुरव स्वेरीमध्ये ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांची १९० वी जयंती साजरी
पंढरपूर: ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाच्या बाबतीत मोलाचे कार्य करून समाजात महिलांना आदराचे स्थान निर्माण केले. महिलांच्या शिक्षणामुळे समाजाला योग्य दिशा मिळत आहे. त्यामुळे समाजातील सर्व महिलांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श घेवून वाटचाल करावी. स्वेरीमध्ये महिलांना मिळणारा आदर्श, विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी असणारी सोय पाहून राज्यातील अनेक पालक आपल्या कन्येला स्वेरीत प्रेवश मिळावा यासाठी प्रयत्नशील असतात. ‘स्वेरी’ हा तंत्रशिक्षणाचे व विद्यार्थी घडविण्याचे प्रभावी महाविद्यालय आहे हे राज्याला माहित आहे. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे, योगदानाचे अनुकरण करून समाजात स्वेरीने एक आदर्श निर्माण केला आहे.’ असे प्रतिपादन गोपाळपूरचे समाजसेवक दिलीप गुरव यांनी केले.

गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांची १९० वी जयंती साजरी करण्यात आली. आसाम राज्यातील धुबरी या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (एस.पी.) म्हणून कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी अभिजित गुरव यांचे वडील, एक आदर्श पालक व गोपाळपूरचे समाजसेवक दिलीप गुरव यांच्या हस्ते ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांच्या प्रतिमेस स्वेरी मध्ये पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीत ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांची जयंती साजरी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published.